संस्थापक व अध्यक्ष 

 मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील गृहस्थ, त्यामुळेच कि काही माहित नाही पण मी  गोरगरिबांचे कष्टकरी कामगार वर्गाचे, तळागाळातील पिढीतांचे दुःख जवळून पाहत होतो, नव्हे जाणत होतो.  सभोवताली सर्व जाती धर्मातील लोकांची जगण्याची व कुटुंबाला आधार देऊन जगविण्याची धडपड उघड्या डोळ्यांनी पाहत होतो.

मनात विचार खूप होते, काय कराव? स्वत:च्या कुटुंबासाठी म्हणा किंवा स्वत:साठी तर सगळेच जगतात आपण सभोवतालच्या स्थितीतील लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे कारण मी पण याच समाजाचा एक घटक आहे. 

संकल्पना ठरत नव्हती नेमके काय करावे . संकल्पना ठरली कि सहकार तत्वावर एक छोटी पतसंस्था सुरु करायची  अत्यंत प्रतिकुल व त्याच परिस्थितीत असलेल्या माझ्या काही सहकारी मित्रांसमोर हा विषय मांडला, त्यांच्या सहकार्याने, पाठींब्याने सहकारी पतसंस्था उभारण्यात सुरुवात केली. काही जेष्ठ अनुभवी व तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेऊन दिनांक  ३१ ऑक्टोबर १९९९ रोजी हि आजची एकता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. 

मी पुन्हा एकदा सर्व विश्वासू ठेवीदार, भागधारक, खातेदार, कर्जदार  आणि संस्थेचे हितचिंतक यांचे मन:पूवर्क आभार मानतो आणि ह्याच एकता परिवाराच्या पुढील यशासाठी शुभेच्छा देतो.   


*- धन्यवाद - *

आपला
श्री. सुनिल (भाऊ) दत्तात्रय जांभूळकर